सातारा : रानगव्यांचा वावर; पारगावकरांना धडकी | पुढारी

सातारा : रानगव्यांचा वावर; पारगावकरांना धडकी

खंडाळा; पुढारी वृत्तसेवा : पारगाव गावच्या पश्‍चिमेस असलेल्या काटवान नावाच्या शिवारात गुरुवारी रानगव्यांची जोडी दिसून आली. रानगव्यांच्या या जोडीने पारगावकरांनी चांगलीच धडकी घेतली आहे. सायंकाळच्या सुमारास या जोडीने आपला मोर्चा असवली व अजनूजच्या दिशेने वळवला.

पारगाव येथील एका शिवारात गुरुवारी दुपारच्या सुमारास दोन रानगवे चरताना दिसून आले. याची माहिती शेतकर्‍यांनी तात्काळ वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनपाल जगताप, वनरक्षक शिंदे व गवारे यांनी संबंधित शिवारात भेट दिली. मात्र हे रानगवे या शिवारातून पाचपांडव टेकडी वरून केसुर्डी हद्दीतील पवळी नावाच्या शिवारात जात होते. त्यावेळी या रानगव्यांना तेथे असलेल्या मेंढपाळाच्या कुत्र्यांनी रोखले. त्यानंतर टेकडी उतरून पारगांवच्या शिवारातून ते रागवे अजनूजच्या बाजूला असणार्‍या डोंगराकडे निघून गेले. दरम्यान, वनपाल आर. आर . जगताप, वनरक्षक गवारे व शिंदे यांनी अजनूज, असवली, कण्हेरी येथील नागरिकांनी सतर्क रहावे. वनविभाग रानगव्यांना डोंगरात पाठवण्याच्या प्रयत्नात आहे. रानगव्यांना शेतकर्‍यांनी हाकलण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button