सातार्‍यात राष्ट्रवादीची तिरंगा बाईक रॅली | पुढारी

सातार्‍यात राष्ट्रवादीची तिरंगा बाईक रॅली

सातारा; पुढारी वृत्तसेवा : भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सातार्‍यातून तिंरगा बाईक रॅली काढण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा येथील राष्ट्रवादी भवनात आ.शशिकांत शिंदे व जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी भवन ते पोवई नाका, हुतात्मा स्मारक अशी तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी विविध घोषणा देवून रॅली मार्ग दणाणून गेला होता.

यावेळी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील महिला जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, युवती जिल्हाध्क्षा स्मिता देशमुख, प्रदेश सचिव स्मिता देशमुख, अतुल शिंदे, गोरख नलावडे, शफिक शेख, डॉ. गणेश होळ, प्रकाश येवले, उषा जाधव, उषा शिंदे, सारिका तपासे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button