सातारा : ‘हर घर झेंडा’; मनामनांत तिरंगा | पुढारी

सातारा : ‘हर घर झेंडा’; मनामनांत तिरंगा

सातारा; पुढारी वृत्तसेवा : देशभक्‍तीचे स्फुल्‍लिंग चेतवणारा दिवस म्हणजे स्वातंत्र्यदिन. स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवात या देशभक्‍तीला उधाण आले होते. जिल्ह्यात गावा-गावांत प्रत्येकाच्या घरावर तिरंगा झेंडा लावल्याचे दिसून आले. प्रत्येक तालुक्यातील प्रशासकीय इमारती अन् धरणांवर तिरंग्याची आकर्षक विद्युत रोषणाई अशा उत्साही वातावरणात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठया जल्‍लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. हर घर झेंडा फडकत असल्याने एक वेगळाच अनुभव सातारकरांना आला. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य ध्वाजारोहण सोहळ्याला नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, आजी-माजी सैनिक, कुटुंबीय, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या 75 फुटी ध्वजस्तंभाचे अनावरण करण्यात आले.

Back to top button