सातारा : पोलिस अधीक्षक कार्यालय उजळले | पुढारी

सातारा : पोलिस अधीक्षक कार्यालय उजळले

राजधानी सातारा तिरंगामय झाली असून सर्वच शासकीय कार्यालये तिरंगाच्या विद्युत रोषणाईने उजळून गेली आहेत. अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पोलिस अधीक्षक कार्यालय तिरंगा विद्युत रोषणाईमुळे लखलखून गेले आहे. सातार्‍यातील सर्वच शासकीय कार्यालयांवर तिरंगा विद्युत रोषणाई साकारण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी हा परिसर तिरंगा रोषणाईमुळे लक्षवेधक ठरत असून डोळे दिपवू लागला आहे.

Back to top button