कराड विभागात पावसाचा जोर वाढला | पुढारी

कराड विभागात पावसाचा जोर वाढला

कराड : चार दिवसांपासून कराड विभागात पावसाचा जोर वाढला असून कृष्णा, कोयना नदीच्या पाणीपातळीत सरासरी दोन फुटांनी वाढ झाली आहे. रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी पावसाची संततधार कायम होती. कराड जवळ कृष्णा पुलाजवळ पाणी उंची 2 फुटाने वाढली आहे. तर कोयना नदीच्या पाणी पातळीत सव्वा दोन फुटाने वाढ झाली आहे. खोडशी बंधरा भरला असून, सांडव्यावरून एका फुटाने पाणी वाहू लागले आहे.

पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. ओढे भरून वाहू लागले आहेत. शेतात पाणी साचल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. सोमवारी दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. तालुक्यात सर्वत्र कमी अधिक पावसाची नोंद झाली आहे. मागील महिन्यात उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर वाढविल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. खरीप पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस उपयोगी ठरला आहे.

Back to top button