सातारा : शाहूपुरी-माळवाडी रस्त्यावर वडाचे झाड कोसळले, काही काळ वाहतूक ठप्प 

झाड कोसळले

कण्हेर; पुढारी वृत्तसेवा : शाहूपुरीपासून माळवाडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सोमवारी पहाटे मोठे वडाचे झाड कोसळले. यामुळे येथील वाहतूक सुमारे ५ तास ठप्प झाली होती. अखेर सकाळी अकराच्या दरम्यान हे झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

शाहूपुरी परिसरात रविवारी सकाळपासून पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली. वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शाहूपुरी येथील आदर्श कॉलनीनजीक मुख्य रस्त्यावरचे वडाचे झाड कोसळले.  शाहूपुरीपासून कोंडवे खिंडीतून कण्हेर परिसरात जाण्यासाठी हा एकमेव मुख्य रस्ता आहे. यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ होत असते.  या रस्त्यावर वडाचे झाड कोसळल्याने येथील वाहतूक ठप्प झाली होती.  झाड विजेच्या तारावर पडल्याने नजीकचे दोन विजेचे खांबही भुईसपाट झाले.

पहाटेपासून कोंडवे व आंबेदरे परिसरातील वीज बंद झाली. संबंधित यंत्रणेकडून झाड काढण्याचे काम जवळ- जवळ दोन तासापासून युद्ध पातळीवर सुरू होते. अखेर सकाळी अकराच्या सुमारास वडाचे झाड हटवून या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. तसेच येथील विजेचे खांब व तारांचीही दुरुस्ती महावितरणकडून करण्यात येत असून, सायंकाळपर्यंत वीज दुरुस्ती होईल,अशी माहिती महावितरण विभागाकडून यावेळी देण्यात आली.

हेही वाचलंत का?
Exit mobile version