सातारा : काकाने १० महिन्यांच्या पुतण्‍याला टाकले विहिरीत | पुढारी

सातारा : काकाने १० महिन्यांच्या पुतण्‍याला टाकले विहिरीत

कोडोली: पुढारी वृत्तसेवा : सख्‍ख्‍या काकाने आपल्‍या १० महिन्‍याच्‍या पुतण्‍याला विहिरीत टाकले. हा  धक्कादायक प्रकार आज (दि. ६) सकाळी ९ च्या सुमारास दत्तनगर- कोडोली ( जि. सातारा)  येथे घडला. या घटनेबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्‍यक्‍त केला जात आहे.

लहान भावाने मोठ्या भावाच्या दहा महिन्यांच्या मुलाला घरातून दुकानात घेऊन जात असल्याचे सांगून बाहेर नेले. त्यानंतर सातारा- रहिमतपूर रस्त्याचे कडेला असलेल्या विहिरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार आज (दि. ६) सकाळी ९ च्या सुमारास दत्तनगर- कोडोली ( जि. सातारा)  येथे घडला.

स्‍वत: फाेनकरुन दिली भावाला माहिती

या  घटनेची माहिती लहान भावनेच मोठ्या भावाला फोन करून सांगितली. तो घटना स्थळावरून पसार झाला. दरम्यान, मुलाचा मृत्यू झाला असून, आरोपीला सातारा शहर व एमआयडीसी पोलिसांनी काही तासांतच अटक केली आहे. या घटनेनंतर दत्तनगर- कोडोली येथे खळबळ उडाली. चिमुकल्‍याच्‍या मृत्यूवर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. लहान भावाच्या या कृत्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Back to top button