सातारा : अजिंक्यताऱ्यावरून दरीत कोसळलेला व्यक्ती १२ तास अडकून पडला | पुढारी

सातारा : अजिंक्यताऱ्यावरून दरीत कोसळलेला व्यक्ती १२ तास अडकून पडला

सातारा : पुढारी वृत्तसेवा; पावसामुळे सर्व किल्ल्यांवर घसरण निर्माण झाली आहे. अशातच साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ला फिरण्यासाठी गेला असताना पाय घसरून दरीत पडल्याने एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली. हणमंत जाधव असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 12 तासांहून अधिक काळ हणमंत जाधव हे दरीत अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला जखमीस बाहेर काढण्यात यश आले.

हेही वाचा

Back to top button