कराड : कोयना वसाहत भाजपा समर्थकांकडे | पुढारी

कराड : कोयना वसाहत भाजपा समर्थकांकडे

कराड : पुढारी वृत्तसेवा राजकीय दृष्ट्या संवेदनशील कोयना वसाहत ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा नेते डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडी समर्थकांचा पराभव केला आहे. सत्ताधारी गटाने 10 जागांवर विजय मिळवला असून एका जागेवर अपक्षाने चमत्कार घडवला आहे. भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले समर्थक स्व. राजेंद्र पाटील कोयना विकास आघाडीचे चंद्रशेखर पाटील, उमेश कुलकर्णी, संगिता पाटील, विनायक कुलकर्णी, सुवर्णा वळीव, शीतल जाधव, कुसुम पुजारी, सम्राट पाटील, रजनी गुरव, सुनीता भोसले यांनी विजय मिळवला आहे.

तर आ. पृथ्वीराज चव्हाण, अ‍ॅड. उदयसिंह पाटील – उंडाळकर समर्थक आघाडीला एकही जागेवर विजय मिळविता आलेला नाही. विजयी उमेदवारांनी सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांंच्या पुतळ्यास अभिवादन केले. कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

Back to top button