मालट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार | पुढारी

मालट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नायगाव : पुढारी वृत्तसेवा पुणे-बंगळूर महामार्गावर धनगरवाडी गावच्या हद्दीत मालट्रकने दुचाकीस दिलेल्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली. संकेत सेवक सावंत (वय-20 रा. केंजळ ता.वाई) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हा युवक त्याच्या दुचाकी क्र. एमएच 12 एच वाय -3736) वरुन पुण्याकडे भरधाव वेगाने निघाला होता.

सातार्‍याकडून पुणे दिशेने जाणार्‍या मालट्रक क्र. (जीजे 12 बी झेड 7256) ला या युवकाची दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात युवक जागीच ठार झाला. हा युवक मालट्रकला धडकून मालट्रकच्या मागील टायरमध्ये अडकला. काही अंतर तो फरपटत गेल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी जावून शिरवळ पोलीसांनी परिस्थितीची पाहणी केली. या घटनेची नोेंद शिरवळ पोलिसात झाली आहे.

Back to top button