सातारा : तिसऱ्या लग्‍नात पहिल्‍या बायकोची एन्ट्री; नातेवाईकांत लोखंडी पाईप,दगड,पट्ट्याने मारहाण,परस्परविरोधी तक्रारी | पुढारी

सातारा : तिसऱ्या लग्‍नात पहिल्‍या बायकोची एन्ट्री; नातेवाईकांत लोखंडी पाईप,दगड,पट्ट्याने मारहाण,परस्परविरोधी तक्रारी

फलटण ; पुढारी वृत्तसेवा : दुधेबावी, ता. फलटण मंगळवारी येथे सुरू असलेल्या एका लग्नात राडेबाजी झाली. यावेळी तिसरे लग्न करणार्‍या नवर्‍याला पहिल्या पत्नीने विरोध केला. या रागातून नवर्‍यासह त्याच्या नातेवाईकांनी पहिल्या बायकोसह तिच्या नातेवाईकांना मारहाण केली. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, दुधेबावी येथे गणेश वामन एकळ यांचे तिसरे लग्न सुरू होते. यावेळी त्यांच्या पहिल्या पत्नी किर्ती गणेश एकळ या त्या ठिकाणी आल्या. या लग्नाला किर्ती आणि त्यांच्या नातेवाईकांनी विरोध केला.

यावर चिडून जाऊन नवरा गणेश वामन एकळ याच्यासह विकास वामन एकळ, संगीता विकास एकळ, कांताबाई वामन एकळ, डॉ. एकळ (संपूर्ण नाव माहित नाही) (सर्व रा. दुधेबावी, ता. फलटण), रोहिणी दत्तात्रय गंगाणे (रा. कोल्हापूर) यांच्यासह 10 ते 12 जणांनी किर्ती यांच्या नातेवाईकांना लोखंडी पाईप, दगड व पट्ट्याने मारहण केली. यामध्ये या भांडणात किर्ती यांचा विनयभंग करण्यात आला.

या गोंधळात किर्ती यांच्या पायातील जोडवी, मोबाईल, सोन्याची चैन गहाळ झाली. याबाबतची तक्रार किर्ती एकळ यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली. याला परस्परविरोधी तक्रार बाळू पोपट सोनवलकर यांनी दिली आहे. यामध्ये कुलदैवताच्या मंदिरामध्ये भांडणे करू नका, असे बोलल्याच्या रागातून भानुदास एकनाथ उराडे याने लोखंडी गजाने मारहाण केली असल्याचे म्हटले आहे.

Back to top button