सातारा : रस्ता चौपदरीकरणाची कामे अपूर्ण असल्याने मेढ्यात रस्त्यावर पाणी | पुढारी

सातारा : रस्ता चौपदरीकरणाची कामे अपूर्ण असल्याने मेढ्यात रस्त्यावर पाणी

मेढा; पुढारी वृत्तसेवा :  मेढा व परिसरात जोरदार पाऊस सुरु असून अवघे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान विटा-पोलादपूर या टप्प्यातील रस्ता चौपदरीकरणाचे काम अपूर्ण असल्याने मेढ्यात रस्ते जलमय होत आहेत.

मेढा-महाबळेश्वर मार्गावरील मुख्य रस्त्यांच्या नाल्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, पूर्वी जे ओढे नाले होते त्यांचे पाणी जाण्यासाठी पुरेसे व व्यवस्थित चर काढले नाहीत. त्यामुळे काही ठिकाणी ओढ्यांना जाणारे पाणी रस्त्याला टाकलेल्या मोरीतून न जाता रस्त्यावरूनच वाहत आहे. त्यामुळे मेढ्यातील रस्त्यावर अक्षरशः पाण्याचा तलाव बनल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. चालणार्‍यांना यातून वाट काढणे जिकीरीचे बनत आहे.

पाचवडकडे जाणार्‍या रस्त्याला गटारे नसल्याने येथे सगळे पाणी रस्त्यावरच येत आहे. ठेकेदाराच्या कामावर नगरपंचायतीने लक्ष देऊन काम करून घेतले असते तर रस्त्यावर पाणी तुंबण्याची वेळच आली नसती.

आजअखेर 584 मिमी पाऊस
जावलीत जून ते आजअखेर 584 मि.मी. पावसाची नोंद झाली असून बामणोली मंडलात सर्वात जास्त पर्जन्यमान आहे तर आनेवाडी मंडलात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे.

Back to top button