सातारा : लोणंदला बोकड, बकऱ्यांचा रेकॉर्ड ब्रेक बाजार भरला, कोट्यवधींची उलाढाल (Video)

लोणंद : पुढारी वृतसेवा : लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील शेळी, मेंढी, बोकड व बकरी बाजारात कोटींची उलाढाल झाली. तीन दिवसांनी दि. १० जुलै रोजी रविवारी बकरी ईद आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती आवारात रेकॉर्ड ब्रेक बकरी बाजार भरला. त्यामुळे बाजार समितीला जत्रा भरल्याचे स्वरूप आले होते. बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. पहाटे पाचपासून बाजारात आवक येत होती. आजच्या बाजारात सुमारे बकरी व बोकडांचे दर पाच ते पन्नास हजारापर्यंत निघाले.
आजच्या बाजारात बकरी व बोकड खरेदीसाठी कर्नाटक, गोवा राज्यासह हुबळी, घारवाड, बेंगलोर, कोकणातील महाड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आदी भागातील आले होते. वाहनांची संख्याही मोठी होती. बाजाराला खरेदीदार व विक्रीदार आल्याने या परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.
हेही वाचा :
- कामशेत : उकसानमध्ये शाळेची भिंत कोसळली
- दुधिवरे खिंडीत दरड कोसळली; लोणावळा- पवनानगर मार्गादरम्यानची घटना
- नगर : शेवगावात विविध पक्षांचे धरणे