सातारा : विंग येथे दुचाकी अपघातात एक ठार; तीन जण जखमी

कराड : पुढारी वृत्तसेवा : दोन दुचाकींच्या अपघातात एक ठार तर तीन जण जखमी झाले. जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. विंग ता. कराड येथे लक्ष्मीकृपा मंगल कार्यालयासमोर सोमवार दि. 4 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

विशाल राजेंद्र जाधव (वय 23, रा. पोतले, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर शिवाजी निवास जाधव (वय 24), अंजली शिवाजी जाधव (वय 22, दोघेही रा. पोतले, ता. कराड) व अक्षय जालिंदर नलवडे (वय 26, रा. कोळे, ता. कराड) हे तिघेजण जखमी झाली आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, विंग येथे कराड-ढेबेवाडी रस्त्यावर लक्ष्मीकृपा मंगल कार्यालयासमोर दुपारी चार वाजण्याच्या एका दुचाकीवरून रस्ता ओलांडत असताना दुसर्‍या दुचाकीने धडक देऊन झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. तर तीन जण जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळतात पोलीस व स्थानिक नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यांनी जखमींना त्वरित रुग्णालयात हलवले. दरम्यान विशाल जाधव यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. अपघात स्थळी पंचनामा करून पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतले आहेत. रात्री उशिरापर्यंत कराड तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती.

Exit mobile version