सह्याद्री कारखान्यावर पी. डी. पाटील जयंती विविध उपक्रमांनी साजरी | पुढारी

सह्याद्री कारखान्यावर पी. डी. पाटील जयंती विविध उपक्रमांनी साजरी

मसूर : पुढारी वृत्तसेवा कराड नगरीचे शिल्पकार स्व.पी. डी. पाटील आणि माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कारखान्याच्या मेनगेटवर त्यांच्या प्रतिमांना मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याचबरोबर आदरणीय पी. डी. पाटील आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिनाचे औचित्य साधून, सह्याद्री सहकारी साखर कारखाना व वन विभागाच्या वतीने कारखाना नजीकच्या महादेव डोंगर उतारावर आ. बाळासाहेब पाटील व वनपरिक्षेत्रपाल कोल्हापूर रामानुजन यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी डीएफओ सातारा महादेव मोहिते, तालुका वनसंरक्षक तुषार नवले, कराडचे गटविकास अधिकारी उदय साळुंखे, नायब तहसीलदार आनंदराव देवकर, तालुका उपनिबंधक संदीप जाधव, सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या सरचिटणीस सौ.संगीता साळुंखे, कारखान्याच्या व्हा.चेअरमन लक्ष्मीताई गायकवाड, सौ.शारदा पाटील, कांतिलाल पाटील, लालासाहेब पाटील, जशराज पाटील, माणिकराव पाटील, अविनाश माने, पै.संजय थोरात, बजरंग पवार, रामदास पवार, रामचंद्र पाटील, सर्जेराव खंडाईत, वसंतराव कणसे, पांडुरंग चव्हाण, लहुराज जाधव, संजय कुंभार, जयवंत थोरात, माजी सनदी अधिकारी तानाजीराव साळुंखे, संचालक आबासाहेब पाटील उपस्थित होते.

Back to top button