सातारा : जिल्ह्यातील धरणे होऊ लागली रिकामी | पुढारी

सातारा : जिल्ह्यातील धरणे होऊ लागली रिकामी

सातारा; पुढारी वृत्तसेवा : पावसाने पाठ फिरवली असल्याने जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा खाली होवू लागला आहे. त्यामुळे बहुतांश धरणे 20 टक्क्यांपेक्षा खाली आली आहेत. साठा दिवसेंदिवस कमी होत असताना अपेक्षित पाऊस पडत नसल्याने सार्‍यांची चिंता वाढली आहे. ही धरणे केव्हा भरणार? हीच विवंचना बळीराजाला लागून राहिली आहे.

जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली असल्याने धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे धरणात ठिकठिकाणी गाळ दिसू लागला आहे. बहुतांश छोट्या-मोठ्या धरणातील पाणी पातळी खालावल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दिवसेंदिवस धरणातील पाणी साठा कमी होवू लागला आहे. त्यामुळे बळीराजाचे डोळे आता आभाळाकडे लागले आहेत. पाऊस नसल्याने जिल्ह्यातील पेरण्याही रखडल्या आहेत. ही धरणे ऑगस्टपर्यंत तरी भरणार का? असा प्रश्‍न बळीराजाला पडला आहे.

कोयना धरणात आजची पाणी पातळी 621.59 मीटर असून आजचा उपयुक्त पाणीसाठा 8.82 टीएमसी म्हणजेच 8.81 टक्के आहे.धोम धरणात आजची पाणी पातळी 733.04 मीटर असून आजचा उपयुक्‍त पाणीसाठा 2.50 टीएमसी पाणी 21.40 टक्के आहे. धोम बलकवडी धरणात आजची पाणी पातळी 621.59 मीटर असून आजचा उपयुक्त पाणीसाठा 0.63 टीएमसी पाणी 8.81 टक्के आहे. कण्हेर धरणात आजची पाणी पातळी 673.64 मीटर असून आजचा उपयुक्त पाणीसाठा 1.94 टीएमसी म्हणजे 20.24 टक्के आहे. उरमोडी धरणात आजची पाणी पातळी 684.17 मीटर असून आजचा उपयुक्‍त पाणीसाठा 4.06 टीएमसी म्हणजे 42.04 टक्के आहे.तारळी धरणात आजची पाणी पातळी 687.25 मीटर असून आजचा उपयुक्त पाणीसाठा 2.06 टीएमसी म्हणजे 35.35 टक्के आहे.

निरा देवघर धरणात आजची पाणी पातळी 631.00 मीटर असून आजचा उपयुक्त पाणीसाठा 0.38 टीएमसी म्हणजे 3.24 टक्के आहे. भाटघर धरणात आजची पाणी पातळी 597.31 मीटर असून आजचा उपयुक्त पाणीसाठा 1.49 टीएमसी म्हणजे 6.34 टक्के आहे. वीर धरणात आजची पाणी पातळी 573.66 मीटर असून आजचा उपयुक्त पाणीसाठा 3.99 टीएमसी म्हणजे 42.40 टक्के आहे. मध्यम प्रकल्प असणार्‍या येरळवाडी धरणात आजची पाणी पातळी 695.45 मीटर असून आजचा उपयुक्त पाणीसाठा 0.15 टीएमसी म्हणजे 21.38 टक्के आहे. नेर धरणात आजची पाणी पातळी 810.37 मीटर असून आजचा उपयुक्त पाणीसाठा 0.14 टीएमसी म्हणजे 32.65 टक्के आहे. राणंद धरणात आजची पाणी पातळी 666.68 मीटर असून आजचा उपयुक्त पाणीसाठा 0.08 टीएमसी म्हणजे 34.89 टक्के आहे. आंधळी धरणात आजची पाणी पातळी 103.50 मीटर असून आजचा उपयुक्‍त पाणीसाठा 0.04 टीएमसी म्हणजे 14.27 टक्के आहे. नागेवाडी धरणात आजची पाणी पातळी 835.60 मीटर असून आजचा उपयुक्त पाणीसाठा 0.04 टीएमसी म्हणजे 17.63 टक्के आहे. मोरणा धरणात आजची पाणी पातळी 631.95 मीटर असून आजचा उपयुक्त पाणीसाठा 0.00 टीएमसी म्हणजे 0.00 टक्के आहे.

Back to top button