कराड : पाल जि.प. गटात भाजप केंद्र प्रमुखांची बैठक | पुढारी

कराड : पाल जि.प. गटात भाजप केंद्र प्रमुखांची बैठक

कराड; पुढारी वृत्तसेवा : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीची पाल जिल्हा परिषद गटाची शक्ती केंद्रप्रमुख व सशक्त बुथ प्रमुख यांची संयुक्त बैठक पाल येथे झाली.

बैठकीसाठी माजी जि.प. सदस्य सागर शिवदास, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ, सुरेश पाटील, प्रमोद गायकवाड, सुनील शिंदे, महेशकुमार जाधव, सुर्यकांत पडवळ तसेच भाजपाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

सागर शिवदास म्हणाले, भारतीय जनता पार्टी कमळ चिन्हावरती जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लाढवणार आहे. याचा भाग म्हणून शक्ती केंद्रप्रमुख, बुथ प्रमुख यांनी तळागाळापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेली लोकाभिमुख कामे सामान्य लोकांपर्यंत पोचवावी. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये निवडून जावा यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन करण्यात आले.

भाजपाच्या वतीने प्रत्येक जिल्हा परिषद गटात शक्ती केंद्रप्रमुख व सशक्त बुथ प्रमुख यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण अद्याप जाहीर झाले नसले तरी जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गणात त्यांच्याकडून गटबांधणी सुरू झाली आहे. निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जाणार असल्याने त्या अनुशंगाने तयारी सुरू करण्यात आली आहे.

Back to top button