भाजप खासदार, आमदारांनी साजरा केला आनंदोत्सव | पुढारी

भाजप खासदार, आमदारांनी साजरा केला आनंदोत्सव

सातारा : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेचे आ. एकनाथ शिंदे यांनी 40 हून अधिक आमदार घेऊन बंड केले आहे. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार जाऊन भाजप-शिवसेना सरकार पुन्हा येणार असल्याने भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शासकीय विश्रामगृह येथे आ. जयकुमार गोरे यांनी खा. रणजितसिंह निंबाळकर यांना पेढा भरवत आनंद साजरा केला.

महाविकास आघाडीत शिवसेना आमदारांचे खच्चीकरण होत आहे. विधानपरिषद निवडणुकीचे मतदान होताच शिवसेनेचे आ. एकनाथ शिंदे यांनी 40 हून आमदारांना घेऊन सुरत गाठत बंड केले. त्यानंतर महाराष्ट्रात सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेना व भाजपचे युती सरकार स्थापन होणार असल्याने राज्यातील भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुण्यात फ्लेक्स लागले असताना बुधवारी दुपारी माण-खटावचे भाजप आ. जयकुमार गोरे व माढ्याचे खा. रणजित निंबाळकर यांना शासकीय विश्रामगृह येथे पेढा भरवत आनंद साजरा केला.

Back to top button