सातारा : ज्ञानमंदिरांमध्ये आजपासून किलबिलाट, ठिकठिकाणी प्रवेशोत्सव; नवागतांचे झाले वाजत-गाजत स्वागत | पुढारी

सातारा : ज्ञानमंदिरांमध्ये आजपासून किलबिलाट, ठिकठिकाणी प्रवेशोत्सव; नवागतांचे झाले वाजत-गाजत स्वागत

सातारा : पुढारी वृत्तसेवा; नवीन शैक्षणिक वर्षातील जिल्ह्यातील प्राथमिकच्या 2 हजार 710, माध्यमिक 767 तर उच्च माध्यमिक 215 शाळांचे वर्ग आजपासून सुरु होणार आहेत. ठिकठिकाणी विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले.ढोल-ताशाच्या गजरात वाजत-गाजत नवागतांचे स्वागत झाले . सुमारे दीड महिना बंद असलेल्या ज्ञानमंदिरांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरु झाला आहे.

उन्हाळी सुट्टी संपून नवीन शैक्षणिक वर्ष दि. 13 जून रोजीच सुरु झाले असले तरी विद्यार्थ्यांची शाळा आजपासून सुरु झाली आहे.शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत झाले. दरम्यान, राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने शाळा प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला असून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना शिक्षणविभागाकडून सर्वच शाळांना देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा :

Back to top button