कराड दक्षिणेत नव्या गट-गणाचा समावेश; जुन्याचे अस्तित्व संपुष्टात | पुढारी

कराड दक्षिणेत नव्या गट-गणाचा समावेश; जुन्याचे अस्तित्व संपुष्टात

कराड, पुढारी वृत्तसेवा : बहुप्रतिक्षीत कराड तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि गणांची पुनर्रचना गुरुवारी जाहीर झाली. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात वडगाव हवेली हा गट वाढला आहे. तर आटके आणि वडगाव हवेली या दोन नवीन पंचायत समिती गणांची कराड तालुक्यात भर पडली आहे. त्याचवेळी जुन्या कालवडे गणाचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.

तसेच कराड दक्षिण आणि कराड उत्तर या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील गावांचा समावेश असणाऱ्या सैदापूर जिल्हा परिषद गटातील हजारमाची गणात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा वरचष्मा असलेल्या गावांचा समावेश असल्याने सैदापूर जिल्हा परिषद गट राष्ट्रवादीसाठी सोईस्कर ठरण्याची चिन्हे आहेत.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात विंग जिल्हा परिषद गटातील कोळे पंचायत समिती गणात कोळे, बामणवाडी, तारुख, कुसूर, कोळेवाडी, मराठवाडी, शिंदेवाडी, शिंगणवाडी, अंबवडे आणि वानरवाडी या गावांचा समावेश आहे. तर याच गटातील विंग गणात विंग, शिंदेवाडी, पोतले, घारेवाडी, जाधववाडी, नवीन घारेवाडी, येरवळे आणि येणके या गावांचा समावेश आहे. वारुंजी जिल्हा परिषद गटात कोयना वसाहत पंचायत समिती गणात कोयना वसाहतसह जखिणवाडी, नांदलापूर, धोंडेवाडी आणि चचेगाव या गावांचा समावेश आहे. याच गटातील वारुंजी गणात वारुंजीसह गोटे, वनवासमाची आणि मुंडे या गावाचा समावेश आहे.

सैदापूर जिल्हा परिषद गटातील सैदापूर गणात सैदापूर आणि गोवारे या दोनच गावांचा समावेश आहे. तर हजारमाची पंचायत समिती गणात बनवडी, विरवडे, हजारमाची, बाबरमाची, डिचोली आणि वनवासमाची या गावांचा समावेश आहे.

कार्वे जिल्हा परिषद गटात कार्वे गणात कार्वे, कोरेगाव, टेंभू, गोपाळनगर आणि सयापूर या गावांचा समावेश आहे. याच गटातील गोळेश्वर गणात मुनावळे, गोळेश्वर, कापील, पाचवड वसाहत, कालेटेक, नारायणवाडी आणि चौगुले मळा या गावांचा समावेश आहे.

नव्याने झालेल्या वडगाव हवेली जिल्हा परिषद गटातील शेरे गणात शेरे, थोरात मळा, शेणोली, शेणोली स्टेशन, गोंदी, जुळेवाडी या गावांचा समावेश आहे. तर वडगाव हवेली पंचायत समिती गणात दुशेरे, संजयनगर, वडगाव हवेली, कोडोली या गावांचा समावेश आहे.

रेठरे बुद्रूक जिल्हा परिषद गटात आटके या नवीन गणात आटकेसह जाधवमळा, वाठार, बेलवडे बुद्रूक, झुजारवाडी, मालखेड आणि नवीन मालखेड या गावांचा समावेश आहे. तर रेठरे बुद्रूक गणात रेठरे बुद्रूकसह रेठरे खुर्द, खुबी या गावांचा समावेश आहे.

काले जिल्हा परिषद गटात ओंड पंचायत समिती गणात ओंड, थोरात मळा, पाटील मळा, विठोबाची वाडी, कासारशिरंबे, तुळसण, पाचुपतेवाडी, मनू आणि ओंडोशी या गावांचा समावेश आहे. काले पंचायत समिती गणात काले, संजयनगर, पवारवाडी, नांदगाव आणि कालवडे या गावांचा समावेश आहे.

येळगाव जिल्हा परिषद गटात उंडाळे पंचायत समिती गणात उंडाळे, शेवाळेवाडी (उंडाळे), टाळगांव, जिंती, महारुगडेवाडी, अकाईचीवाडी, बोत्रेवाडी, साळशिरंबे, म्हासोली, सवादे, बांदेकरवाडी, लटकेवाडी आणि हवेलवाडी या गावांचा समावेश आहे. तर येळगाव पंचायत समिती गणात येळगाव, भरेवाडी, गोटेवाडी, भुरभूशी, गणेशवाडी, घराळवाडी, हणमंतवाडी, येवती, शेवाळवाडी (येवती), शेळकेवाडी (येवती), येणपे, शेवाळवाडी (येणपे), चोरमारवाडी, माटेकरवाडी, लोहारवाडी, शेळकेवाडी (म्हासोली), घोगाव आणि शेवाळेवाडी (म्हासोली) या गावांचा समावेश आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button