Karad News: कराड दक्षिणमधील विकास कामांसाठी 2.50 कोटींचा निधी

आ.डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या प्रयत्नांना यश
Atul Baba Bhosale |
MLA Atul Bhosale File Photo
Published on
Updated on

कराड : कराड दक्षिण मतदारसंघातील विविध गावांमधील विकासकामांसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नांमुळे 2.50 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाला असून, याबाबतचा शासन आदेश नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे.

कराड दक्षिण मतदारसंघातील विविध गावांमधील विकासकामांसाठी निधी मिळावा, यासाठी आ.डॉ. अतुलबाबा भोसले सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करत आहेत. याबाबत त्यांच्यामार्फत दाखल झालेल्या प्रस्तावांची आणि मागण्यांची दखल घेत, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी ग्रामीण विकास कार्यक्रमाच्या 25-15 योजनेअंतर्गत एकूण 2 कोटी 50 लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे.

या निधीच्या माध्यमातून आटके येथे गावअंतर्गत रस्ता सुधारणा करणे (7 लाख), बेलवडे बुद्रुक येथील स्मशानभूमीमध्ये दोन नवीन दाहिनीसह इतर दुरुस्ती (7 लाख), चौगुले मळा येथे गावअंतर्गत रस्ता सुधारणा (7 लाख), दुशेरे स्मशानभूमी दुरुस्ती (9 लाख), वनवासमाची गावअंतर्गत रस्ता सुधारणा (7 लाख), गोळेश्वर येथे वैभव पार्कमध्ये रस्ता सुधारणा (15 लाख), लक्ष्मीनगर सभामंडप बांधकाम (5 लाख), काले येथे गावअंतर्गत रस्ता सुधारणा (15 लाख), कापील स्मशानभूमी वेटिंग शेड व वॉल कंपाऊंड (7 लाख), कासारशिरंबे यादव मळा स्मशानभूमी दुरुस्ती (7 लाख), कुसूर येथे नवीन स्मशानभूमी बांधणे (10 लाख), नांदगाव स्टँड विभागातील स्मशानभूमी सुधारणा (7 लाख), ओंड बिरोबानगर येथे सभामंडप बांधणे (15 लाख), पोतले येथे महादेव मंदिरास संरक्षण भिंत बांधणे (15 लाख), रेठरे खुर्द येथे मरीआई मंदिर सभामंडप बांधणे (10 लाख),

येळगाव स्मशानभूमी दुरुस्ती (9 लाख), सैदापूर गावअंतर्गत रस्ता सुधारणा (20 लाख), शेणोली येथे गावअंतर्गत रस्ता सुधारणा (10 लाख), विंग येथे इंजाबाई मंदिर सभामंडप बांधणे (10 लाख), कार्वे येथे नवीन स्मशानभूमी बांधणे (15 लाख), येणपे येथे वाघजाई मंदिर परिसरात सिमेंट काँक्रीट फ्लोअरिंग करणे (9 लाख), वारुंजी ग्रामपंचायत शाळा परिसरात रस्ता सुधारणा (10 लाख), टाळगाव शेवाळवाडी येथे रस्ता काँक्रीटीकरण (7 लाख), आटके भैरवनाथ मंदिर ते मुकुंद महाराज मठ रस्ता काँक्रीटीकरण (7 लाख) आणि शेरे बिरोबा मंदिर सभामंडप दुरुस्ती व परिसर सुधारणा करणे (10 लाख) अशा एकूण 2 कोटी 50 लाखांच्या विकासकामांचा समावेश आहे. सदरच्या विकास कामांना लवकरच प्रारंभ करण्यात येणार असल्याने, कराड दक्षिण मतदारसंघातील ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांमधून मंत्री यकुमार गोरे, आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासह महायुती सरकारला धन्यवाद देण्यात येत आहेत. कराड दक्षिणमधील गावागावातील विकासकामांसाठी निधीची उपलब्धता होत असल्याने या गावांचा चेहरा बदलणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news