खटाव : धारपुडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार | पुढारी

खटाव : धारपुडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

खटाव ; पुढारी वृत्तसेवा : खटाव तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या धारपुडी (ता.खटाव) येथे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. धारपुडी ग्रामपंचायतीचे सरपंच, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक शिलेदारांनी आ. महेश शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश केला आहे. या राजकीय धक्यामुळे राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे. दरम्यान आ.महेश शिंदे यांनी धारपुडीच्या शिवारात येत्या दोन वर्षांत पाणी येणार असल्याचे सांगत धारपुडीच्या विकास कामांसाठी 25 लाख रूपयांचा आमदार निधी जाहीर केला. तर ग्रामपंचायत इमारतीसाठी 25 लाखांचा निधी देणार असून या भागाचा अनुशेष भरून काढू, अशी ग्वाही दिली.

यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल बर्गे, सरपंच आप्पासो पवार, सोसायटीचे चेअरमन नामदेव यादव, ग्रा. पं. सदस्या लतीका यादव, शिला यादव, नितीन यादव, अमोल जगताप, श्रीमंत जगताप, अशोक देशमुख, तात्यासो जगताप, मधुकर सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. महेश शिंदे म्हणाले, झालेले प्रवेश ही परिवर्तनाची नांदी आहे. धारपुडी गावाने कायम प्रेम दिले. मला जिल्हा परिषद सदस्य व आता आमदार या गावानेच केले आहे. जिल्हा परिषद सदस्य असताना रस्ता, पाणी योजना, स्मशानभूमीची कामे करत डेव्हलपमेंट केली होती. जिहे-कठापूरचे पाणी नेर तलावात आणले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली आहे. या योजनेचे फेर सर्वेक्षण करायचे फायनल झाले आहे. यासाठी निधी मंजूर आहे. केंद्राने पंतप्रधान किसान योजनेत वर्गीकरण केले आहे. केंद्र व राज्याचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. धारपुडीच्या विकासासाठी आमदार निधीतून 25 लाख देणार आहे. येत्या एक महिन्यात संपूर्ण पालखी मार्ग पूर्ण करण्यात येईल. त्याचबरोबर ग्रामपंचायत कार्यालयासाठी मातोश्री ग्रामपंचायत योजनेतून 25 लाखांची तरतूद करणार असल्याची ग्वाही आ. महेश शिंदे यांनी दिली.

श्रीमंत जगताप, नितीन यादव, सागर यादव यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रेमचंद जगताप यांनी केले. तर आभार निलेश सुतार यांनी मानले.

यावेळी संतोष कणसे, बापुराव जगताप, अशोक देशमुख, विलास फडतरे, हणमंत सुतार, भिमराव गायकवाड, रमेश पाटोळे , ग्रामपंचायत सदस्य अमोल अशोक जगताप, मोहन जगताप, जयवंत शंकर जगताप, भाऊसो फडतरे, नितीन यादव, हणमंत सावंत, प्रदिप वि. जगताप, आकाश जगताप, अनिकेत यादव, कल्पेश देशमुख, अभिजीत यादव, विक्रम धापटे, प्रथमेश जाधव उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसला आ. महेश शिंदे यांचा दे धक्का

धारपुडी येथील अनेक शिलेदारांनी आ. महेश शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश केला. यामध्ये सरपंच आप्पासो पवार, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन नामदेव यादव, ग्रामपंचायत सदस्य लतिका यादव आणि शीला यादव, सागर यादव, राहुल जगताप, सूर्यकांत सूर्यवंशी, गणेश देशमुख, मच्छिंद्र यादव, नितीन इंगवले, अर्जुन यादव, राजेंद्र सूर्यवंशी, दीपक पाटोळे, नवनाथ यादव, अमोल चिंचकर, निलेश यादव, सचिन विलास यादव, राजेंद्र यादव, विकास यादव, किशोर यादव, आनंदराव बबन जगताप, आनंदराव यादव, सचिन यादव या पदाधिकारी व शिलेदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडत आ. महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.

धारपुडी विकास सेवा सोसायटीवर आ. महेश शिंदे गटाचे निर्विवाद वर्चस्व…

धारपुडी विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी नामदेव वामन यादव यांची तर संचालक पदी सुरेश जगताप, प्रमोद कुलकर्णी, दिपक पाटोळे, सौ. सुवर्णा सावंत, कृष्णाबाई जगताप, नारायण चिंचकर यांची निवड करण्यात आली.

Back to top button