पाटण : 558 कुटुंबांच्या पुनर्वसनाचे आव्हान कायम | पुढारी

पाटण : 558 कुटुंबांच्या पुनर्वसनाचे आव्हान कायम

पाटण : गणेशचंद्र पिसाळ

भूकंप, अतिवृष्टी, महापुरानंतर मागील वर्षापासून भूस्खलनामुळे पाटण तालुक्यातील अनेक गाव अक्षरशः खिळखिळी झाली आहेत. सात गावांसह 558 कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचे आव्हान कायम आहे. त्याचबरोबर आणखी 61 गावांवर भूस्खलन होणे, दरड कोसळण्याचे संकट कायम आहे. याशिवाय 41 गावांत अतिवृष्टी, दरड, डोंगर कडा कोसळून संबंधित गावे उद्ध्वस्त होण्याची भीती आहे.
तालुक्यातील कायमस्वरूपी पुनर्वसन करावयाच्या सात गावांमध्ये खालचे व वरचे आंबेघर तर्फ मरळी, ढोकावळे, मिरगाव, काटेवाडी (हुंबरळी), जीतकरवाडी, शिद्रुकवाडीच्या एकूण 558 कुटुंबांचा समावेश आहे. त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी 7.26 हेक्टर जमिनीचे क्षेत्र लागणार असून भूसंपादन कायद्यानुसार त्याची किंमत 3.8 कोटी रुपये तर खाजगी वाटाघाटीनुसार 3.86 कोटी रुपये इतकी अंदाजे रक्कम सुचविण्यात आली आहे. याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

भूस्खलनामुळे बाधित ग्रामस्थांना तात्पुरती निवारा शेड वाटप करण्यात आली असून यामध्ये मिरगाव येथील 98, ढोकावळे 46, हुंबरळी 5 अशा एकूण 149 तात्पुरत्या निवारा शेडचे वाटप करण्यात आले आहे .

तालुक्यात दरड प्रवण व संभाव्य दरड प्रवण क्षेत्रामध्ये खुडुपलेवाडी, कुसवडे, विठ्ठलवाडी (शिरळ), पळासरी, आरल, लुगडेवाडी (केरळ), बोर्गेवाडी , धडामवाडी, गुजरवाडी, चाफोली, आंबवणे, बोंद्री, जाईचीवाडी, टोळेवाडी, डावरी, धजगाव, किल्ले मोरगिरी, मोरगिरी, आटोली, काहिर, दीक्षी, शिद्रुकवाडी, कोकणेवस्ती (आटोली), जोतीबाचीवाडी (येराड), वरंडेवस्ती, आंबेघर, गुंजाळी, झाकडे, लेंडोरी, धोकावळे, मरासवाडी, नाटोशी चव्हाणवस्ती, देसाईवाडा, कुसरुंड, मिरगाव, बाजे, हुंबरळी, नवजा, कामरगाव, जितकरवाडी, भातडेवाडी, धनवडेवाडी, विठ्ठलवाडी, काळगाव, जोशेवाडी, शिंदेवाडी, तामिने, बागलेवाडी, बाटेवाडी, केंजळवाडी, भैरेवाडी, जुगाईवाडी, डफळवाडी, कळंबे, पाबळवाडी, जळव, गायमुखवाडी, पाडळोशी, मसुगडेवाडी अशा 61गावांचा समावेश असून यशदा पुणे यांचेकडून अशा भूस्खलन झालेल्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे.

दरड, कडा कोसळण्याचा धोका असलेली गावे…

वरंडेवाडी, धडामवाडी, जोतीबाचीवाडी, गुंजाळी (मान्याचीवाडी), झाकडे, धजगाव, मसुगडेवाडी, तामिने, पाडळोशी, जळव, पाबळवाडी, लेंडोरी (धनगरवाडा ), लुगडेवाडी (केरळ), मिरासवाडी (शिरळ), गुजरवाडी ( म्हावशी), काळगाव, चाफोली, आरल, मोरगिरी जुने गावठाण, आटोली गुरेघर अंतर्गत कोकणेवाडी, बाजे (वर सरकून), गोकुळनाला (कामरगाव), किल्ले मोरगिरी, नाटोशी (शिर्केवस्ती), चव्हाणवस्ती, देसाई वाडा, बहिरेवाडी (ढोरोशी), विठ्ठलवाडी (धनगरवस्ती), शिरळ, विठ्ठलवाडी (सणबूर), बाटेवाडी, विहे , डफळवाडी, केंजळवाडी, कळंबे, गायमुखवाडी, कुसरुंड (शिंदेवस्ती), आंबवने, बोंद्री (गोजेगाववस्ती), वाजेगाव धरणाचे आतील,जाईचीवाडी (बोंद्री), भातडेवाडी (जिंती), कवडेवाडी (जुंगटी), घोट, बोर्गेवाडी, टोळेवाडी, आरल, निवकणे या 41 गावांचा समावेश आहे.

Back to top button