बनावट कागदपत्राद्वारे मिळवली नोकरी | पुढारी

बनावट कागदपत्राद्वारे मिळवली नोकरी

उंब्रज : पुढारी वृत्तसेवा

सोसायटी निवडणुकीनंतर विजयी मिरवणुकीवेळी विजयी मिरवणूक सुरू असताना विरोधी गटाच्या व्यक्तीच्या घरात घुसून 13 जणांनी घरात गुलाल टाकत शिवीगाळ करत शिवीगाळ, दमदाटी केल्याची घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडली. झाडाच्या कुंड्याची व दुचाकीजवळ फटाके लावत नुकसान करण्यात आले आहे. याप्रकरणी 13 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आली असून उंब्रज पोलिसांनी 5 जणांना अअक केली आहे. संबंधितांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अनिकेत सदाशिव चव्हाण, विक्रम हिंदुराव आवळे, ओमकार अवधुत कदम, विजय संभाजी चव्हाण, सागर किसन कदम, सुमित संभाजी कदम, गणेश उर्फ वैभव संभाजी कदम, विजय सुभाष कदम, जगन्नाथ अण्णासो कदम व अन्य 3 ते 4 जण सर्व (रा. वडगाव ता. कराड) अशी संशयितांची नावे आहेत. तर अनिकेत चव्हाण, विक्रम आवळे, ओंकार कदम, विजय चव्हाण, सागर कदम (रा.वडगांव) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्या शारदा केशव कदम यांनी फिर्याद दिली आहे. सोसायटी निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी गटाची विजयी मिरवणूक निघाली होती. मिरवणूक घरापर्यंत येऊन परत माघारी जात असताना संशयितांनी घरात प्रवेश करून गोंधळ घातल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Back to top button