सातारा: जिल्ह्यात दोन मुलींवर अत्याचार : सातार्‍यात युवकावर गुन्हा | पुढारी

सातारा: जिल्ह्यात दोन मुलींवर अत्याचार : सातार्‍यात युवकावर गुन्हा

सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातार्‍यात भरदिवसा एका 22 वर्षीय युवकाने घरात एकटी 11 वर्षांची लहान मुलगी असल्याचे पाहून घरात घुसून जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी संशयिताने दिली. दरम्यान, घटनेनंतर बाहेर जात असताना युवक दगडात अडकून पडल्याने तो जखमी झाला आहे.

गणेश सरोदे (वय 22) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. 1 रोजी दुपारी 1 वाजता घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडित मुलीचे आई-वडील गरीब
असून किरकोळ व्यवसाय करुन गुजरान करत आहेत.

दि. 1 रोजी नेहमीप्रमाणे पिडीत मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी 2 वाजता पिडीत मुलीचे वडील घरी आल्यानंतर त्यांना त्यांची मुलगी रडत असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ पत्नीला फोन करुन घरी बोलावून घेतले. मुलीची आई आल्यानंतर तिला बाजूला घेवून नेमके काय झाले आहे? असे विचारल्यानंतर तिने घाबरत घाबरत घडलेल्या घटनेची माहिती दिली.

मुलीवर अत्याचार झाल्याचे ऐकून आई-वडील घाबरुन गेले. घटनेवेळी घाबरुन मुलगी रडू लागल्यानंतर परिसरात खेळत असलेली इतर मुलेही तेथे आली होती. त्यांनीही संशयित आरोपीला पाहिले मात्र तो नंतर तेथून निघून गेला. ही सर्व घटना पिडीत मुलीच्या आई-वडीलांनी ऐकल्यानंतर तात्काळ त्यांनी शहर पोलिस ठाणे गाठले व घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सर्व घटना ऐकल्यानंतर संशयित आरोपी विरुध्द पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, अधिक माहिती घेतली असता संशयित आरोपी याने अत्याचार केल्यानंतर तो घरातून बाहेर गेला. मात्र बाहेर जात असताना तो दगडात अडकून पडला. यामध्ये त्याला दुखापत झाली. यामुळे परिसरात लोक जमले. युवक जखमी झाल्याचे पाहून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

खंडाळ्यात पिता-पुत्रावर गुन्हा

जवळच असलेल्या मंदिरात नेले. त्यानंतर तिच्यावर त्याने जबरदस्तीने अत्याचार केला. ही गोष्ट कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी त्या तरूणाने मुलीला दिली होती. त्यामुळे त्या मुलीने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. काही दिवसांपूर्वी पीडित मुलगी तिच्या मामीकडे गेली होती . त्यावेळी तिने हा सारा प्रकार मामीला सांगितला. त्यानंतर मामीने फोनवरून मुलीच्या आईला या प्रकाराची माहिती दिली. मुलीच्या आईने याप्रकरणी लोणंद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी संबंधित तरुणावर अत्याचार केल्याचा तर अत्याचाराची घटना घडली त्याच दिवशी संशयित आरोपी तरुणाच्या वडीलानेही मुलीला तू माझ्या मुलासोबत लग्न कर अन्यथा तुझ्या घरातील लोकांना मारून टाकीन अशी धमकी दिली. यामुळे तरूणासह त्याच्या वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

Back to top button