वाई : जांभळी येथे मुसळधार पावसामुळे डोंगर खचला; गावात भीतीचे वातावरण | पुढारी

वाई : जांभळी येथे मुसळधार पावसामुळे डोंगर खचला; गावात भीतीचे वातावरण

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा :

वाई तालुक्यातील पश्‍चिम विभागांमध्ये जांभळी गावात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या विभागातील संपूर्ण रस्ते व डोंगरी परिसर खचू लागले आहेत वाई पश्चिम विभागातील जांभळी गावातील पूर्ण डोंगर खचून गावात आला आहे.

पावसाच्या डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याबरोबर दगड माती व गाळ गावात वाहून आला. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

खचलेला डोंगर मधून मातीचा भरावा गावात वाहून आल्याने गावात दलदल निर्माण झाली आहे.

डोंगरातील अनाधिकृत उत्खननामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे २४ तासात झालेल्या मुसळधार पावसाने पूर्ण डोंगर खचून गावात आला. गावात सध्या चिकल मातीचा खच साचला आहे.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : खारघर : धबधब्यावर अडकलेल्या ११८ पर्यटकांची सुटका..!

Back to top button