बिबट्याकडून कुत्रे फस्त; तळमावले परिसरात दहशत कायम | पुढारी

बिबट्याकडून कुत्रे फस्त; तळमावले परिसरात दहशत कायम

सणबूर : पुढारी वृत्तसेवा; 
तळमावले (ता. पाटण) येथील मयूर भुलुगडे यांच्या खळे फाट्यावरील पोल्ट्री फार्ममधील पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. हल्ल्यानंतर बिबट्याने कुत्र्यास शेजारील उसाच्या क्षेत्रात फरफटत नेत त्याचा फडशा पाडला आहे. त्यामुळेच तळमावले, साईकडे, खळे, शिद्रुकवाडी परिसरात बिबट्याची दहशत पुन्हा एकदा वाढली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी मयूर भुलगडे यांचे खळे फाट्यावर पोल्ट्री फार्म आहे. परिसराची राखण करण्यासाठी त्यांनी एक कुत्रे पाळले आहे. दररोज पोल्ट्रीवर गेल्यावर अंगाखांद्यावर बिलगणारे कुत्रे दोन दिवसांपासून दिसून आले नाही. म्हणून त्यांनी त्याचा शोध घेतला. पण ते सापडले नाही. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या शिबेवाडी वस्तीतील एका उसाच्या फडात एका कुत्र्याचा फडशा पाडलेला शेतकर्‍यांना दिसला. ही माहिती त्यांनी मयूर भूलुगडे यांचे वडील गंगाराम भुलूगडे यांना दिली. ते रात्री पोल्ट्री फार्म येथे रात्री वस्तीला असतात. त्यानंतर गंगाराम भुलुगडे यांनी स्वतः जावून पाहिले तर बिबट्याने त्यांच्या कुत्र्याचा फडशा पाडून राहिलेले अवशेष फडात पडल्याचे त्यांना दिसून आले.

तळमावले, साईकडे,खळे शिद्रुकवाडी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असून त्याने अनेक वेळा येथील शेतकर्‍यांना तसेच वाहनधारकांना दिवसाही बिबट्याचे दर्शन झाले आहे. याशिवाय अनेक वेळा शेळी,कुत्रे यांच्यावर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून शेतकर रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यासाठी आणि दिवसा चारा आणणे, गुरे राखणे, शेतात भांगलण करणे अशा अनेक कारणाने शिवारात एकटे फिरावे लागते. परंतु बिबट्याचा हल्ल्याने आता लोकांच्या मनामध्ये यांनी दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रात्रीच्या वेळीस काही शेतकरी नदी किनारी मोटर सुरू करण्यासाठी जात असतात. अशावेळी पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी बिबट्या येण्याची शक्यता असून शेतकर्‍यांवर हल्ला झाल्यास कोण जबाबदार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. त्यामुळे वनविभागाने सापळा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

हेही वाचलत का?

Back to top button