

कडेगाव : त्रिमली (ता. खटाव) हद्दीत औंधकडून सातार्याकडे निघालेल्या टेम्पोने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात सांगली जिल्ह्यातील शिक्षकाचा मृत्यू झाला. जनार्दन नामदेव मोहिते (रा. सोहोली, ता. कडेगाव, जि. सांगली) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. या घटनेची नोंद औंध पोलिस ठाण्यात झाली आहे.
रविवारी सायंकाळी औंधकडून सातार्याकडे एक टेम्पो निघाला होता. या टेम्पोने त्रिमली हद्दीत चुकीच्या बाजूने दुसर्या टेम्पोला धडक दिली. यामध्ये समोरील टेम्पो उलटला. यानंतर त्याने दुचाकीवरून निघालेल्या मोहिते यांना धडक दिली. त्यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, उलटलेल्या टेंपोचे चालक सचिन सावंत (कुपवाड, जि. सांगली) यांनी रहिमतपूरपर्यंत या टेम्पोचा पाठलाग केला. मात्र चालक सापडला नाही. जनार्दन मोहिते हे कडेपूर येथील शाळेत शिक्षक होते.