

सांगली : सांगलीचे आराध्य दैवत असलेल्या ऐतिहासिक श्री गणपती मंदिर परिसरात दिवाळीनिमित्त अभूतपूर्व दीपोत्सव साजरा करण्यात आला. मंदिर आणि संपूर्ण परिसर हजारो पणत्यांच्या मंगलमय प्रकाशाने उजळून निघाला होता.
श्री गणपती पंचायतन संस्थान, ब्रदरहूड व रोटरॅक्ट क्लब ऑफ कृष्णा व्हॅली यांच्या संयुक्तविद्यमाने दीपावलीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या मनमोहक दृश्याचा अनुभव घेण्यासाठी सांगलीकर नागरिकांनी आणि भाविकांनी गर्दी केली होती. संपूर्ण परिसर ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
रागरसायन हा युवा गायक अभिषेक तेलंग व त्यांचे सहकारी आत्मस्पर्शी सांगीतिक मैफिल सादर केली. त्याला रसिकांनी जोरदार दाद दिली. ब्रदरहूड सांगलीचे अध्यक्ष यश अक्कीमडी, रोट्रॅक्ट क्लब ऑफ कृष्णा व्हॅलीचे अध्यक्ष अतुल खंचनाळे, डॉ. अनुष्का पाटील यांच्यावतीने हा कार्यक्रम करण्यात आला. गणपती पंचायतन संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांचे सहकार्य लाभले आहे. यवुराज आदित्यराजे विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले. दरम्यान, बुधवारी ‘दीपावली पाडवा पहाट’ हा कार्यक्रम होणार आहे.