बीड : कऱ्हेवाडी येथे घरफोडी करून अडीच लाखांचा ऐवज चोरणारा चोरटा जेरबंद

यासह दोन ठिकाणी घरफोडी केल्याची चोरट्याची कबुली
house burglary in Karhewadi
कऱ्हेवाडी येथे घरफोडीतील चोरट्याला अटक करण्यात आली.
Published on
Updated on

आष्टी : तालुक्यातील कऱ्हेवाडी येथील एका बंद घराचे कुलूप तोडून सहा तोळे सोन्यासह पन्नास हजार रूपये रोख, असा २ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. ही घटना आठ दिवसापूर्वी घडली होती. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी (दि.५) रात्री या चोरीचा छडा लावत चोरट्याला ताब्यात घेतले. त्याने कऱ्हेवाडी येथील चोरीसह इतर दोन ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.

house burglary in Karhewadi
राजकोट येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी डॉ. चेतन पाटील जेरबंद

आष्टी तालुक्यातील कऱ्हेवाडी येथील खंडू हरिभाऊ सांगळे याच्या कुटुंबातील सदस्य २८ ऑगस्ट रोजी सकाळी कांदा लागवडीसाठी शेतात गेले होत. या दरम्यान अज्ञात चोरट्याने बंद घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करत सहा तोळे सोन्यासह रोख ५० हजार रूपये असा २ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस अधिक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला घटनास्थळी भेट देत पाहणी करून आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तपास सुरू असताना ही घरफोडी रामेश्वर भोसले यांनी केली असल्याची माहिती पोलिसांना सुत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याचा घरातून त्याला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने या घरफोडीसह आष्टी ठाणे हद्दीत अन्य दोन ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलिस हवालदार अशोक दुबाले, दिपक खांडेकर, पोलीस नाईक सोमनाथ गायकवाड, बाळू सानप, अर्जुन यादव, नामदेव उगले, सुनिल राठोड यांनी केली.

house burglary in Karhewadi
बीड : नेकनूर पोलिसांनी थरारक पाठलाग करून सहाजणांना केले जेरबंद

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news