

सांगली : शहरात बुधवारी सायंकाळी विद्युत पुरवठा सतत ये - जा करत होता. विजेच्या या लपंडावामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत होता.
दरम्यान, महावितरणचे कर्मचारी विविध मागण्यांसाठी बुधवारपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यामुळे वीजपुरवठा कसा होणार याबाबत शंका उपस्थित होत आहे.
महावितरणकडून वीज पुरवठा नियोजन बुधवारी सायंकाळी कोलमडले होते. सायंकाळी पाऊस सुरू होता. विश्रामबाग येथे तांत्रिक बिघाड झाल्याने शहराच्या बहुतेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. वीज सतत ये - जा करीत होती. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
दरम्यान बुधवारी रात्रीपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा महावितरणच्या विविध कर्मचारी संघटनेने दिला आहे. त्यामुळे कर्मचारी संपावर गेल्यास पर्याय व्यवस्था करण्यासाठी अधिकार्यांकडून नियोजन सुरू होते. महावितरणमहावितरणचे एकूण सुमारे 2800 कामगार आहेत. त्यापैकी किती कर्मचारी संपावर जाणार व किती हजर राहणार याची उत्सुकता आहे.