

चरण : चरण (ता. शिराळा) येथे एसटी आणि कार यांच्या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. हा अपघात रविवारी सकाळी साडेसात वाजता घडली. याबाबत कोकरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, विक्रम रमेश राजपुरोहित हे कार (क्रमांक एम.एच.46 ए.एल.1818) घेऊन चांदोलीकडे जात असताना मणदूर - शिराळा आगाराची एसटी (क्रमांक - एम.एच.14 बी.टी.2786) व कार यांच्यात धडक झाली. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सकाळी साडेसात वाजता झालेल्या या अपघातामुळे चांदोली मुख्य रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक तीन तास ठप्प झाली होती.