सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी जिल्ह्यातील सर्व 8 मतदारसंघांतील 118 उमेदवारांचे एकूण 126 अर्ज दाखल झाले. त्यामुळे आतापर्यंत एकूण 195 उमेदवारांचे 249 अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी (दि. 30) उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर आहे.
सांगली विधानसभा मतदारसंघात मंगळवारी 19 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मंगळवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार असे : मीनाक्षी विलास शेवाळे (अपक्ष), अल्लाउद्दीन हयातचाँद काजी (वंचित बहुजन आघाडी), आरती सर्जेराव कांबळे (बहुजन समाज पार्टी), हरिदास श्रीमंत पडळकर (अपक्ष), प्रकाश आप्पासाहेब बिरजे (भारतीय जनता पार्टी), मिलिंद विष्णू साबळे (अपक्ष), शिवाजी राजाराम डोंगरे (अपक्ष), जयश्री मदन पाटील (दोन अर्ज अपक्ष), समीर अहमद सय्यद (अपक्ष), डॉ. संजय महादेव पाटील (अपक्ष), आसिफ नबीलाल बावा (अपक्ष), महादेव ज्ञानोबा साळुंखे (अपक्ष), वीरेंद्रसिंह पृथ्वीराज पाटील (काँग्रेस), मयुरेश सिद्धार्थ भिसे (अपक्ष), जयश्री अशोक पाटील (अपक्ष), राजेंद्र नाथा कांबळे (अपक्ष), उत्तमराव जिन्नाप्पा मोहिते (अपक्ष), सतीश भूपाल सनदी (राष्ट्रीय समाज पक्ष).