

आटपाडी : रेबाई मळा शेटफळे (ता. आटपाडी) येथे मुलीनेच आपल्या वडिलांच्या घरातील सोन्या–चांदीच्या तब्बल १० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुलीसह तिघांविरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत उमाकांत नारायण मोरे (वय ५२, रा. रेबाई मळा, शेटफळे, ता. आटपाडी) यांनी फिर्याद दिली असून आरोपी म्हणून त्यांच्या स्वतःच्या मुलीसह तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. साक्षी उमाकांत कांबळे (रेबाई मळा, शेटफळे, ता. आटपाडी) आणि अक्षय ऐवळे, संदीप कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील सहा महिन्यांपासून ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आरोपी अक्षय ऐवळे, संदीप कांबळे यांनी काहीतरी भीती दाखवून साक्षी हिच्या माध्यमातून फिर्यादी यांच्या घरातील कपाटातील डब्यात ठेवलेले दोन तोळे सोन्याचे गंठण, दोन तोळे सोन्याचे नेकलेस, एक तोळा सोन्याची चैन, दोन तोळे सोन्याच्या बांगड्या, ५०० ग्रॅम चांदी असा एकूण सात तोळे सोने व अर्धा किलो चांदी चोरी करून नेले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ठोंबरे करत आहेत.