

सांगली : येथील एका सफाई कामगाराच्या घरात घुसून चौघांनी साहित्याची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पृथ्वीराज ऊर्फ बन्या रवी लोंढे (वय 19, इंदिरानगर) आणि अभिषेक ऊर्फ आब्या विनोद चव्हाण (21, इंदिरानगर) अशी त्यांची नावे आहेत. चव्हाण यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून लोंढे यास पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
फिर्यादी सविता कांबळे या सफाई कर्मचारी आहेत. मुलगा जीवन याच्यासमवेत संशयितांचा एक महिन्यापूर्वी काही कारणावरून वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून संशयित कांबळे यांच्या घरात घुसले. त्यांनी संसारोपयोगी साहित्याची तोडफोड केली. यातील संशयित ओम पाटील आणि पृथ्वीराज लोंढे यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. त्यांची दहशत मोडण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेने त्यांना शोध घेऊन अटकेची कारवाई केली. बन्या आणि आब्या यास ताब्यात घेऊन त्यांची वरात काढली.