म्हैसाळ : पुढारी वृत्तसेवा फलटणहून कर्नाटकात जाणाऱ्या मिरज तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील विजयनगर ते कागवाडपर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः वाताहत झाली आहे. पावसाळ्यात हा प्रमुख रस्ता पुन्हा एकदा खड्डेमय झाला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड़े पडल्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडत आहे. या मार्गावर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. वाहने रस्त्यावरच बंद पडत आहेत. खड्डे मुजविण्यासाठी लाखो रुपये खर्ची पडले. मात्र खर्च झाला कागदावर आणि खड्डे पडले रस्त्यावर, अशीच सध्याची स्थिती आहे.
विजयनगर-म्हैसाळ ते कागवाड हा सीमाभागातील प्रमुख रस्ता आहे. दररोज हजारो वाहने या रस्त्यावरून जा-ये करतात. खड्ड्यांमुळे या रस्त्याची वाताहत झाली आहे. पावसाळ्यामुळे हा रस्ता अनेक ठिकाणी उखडला गेला आहे. जागोजागी खड्डे फलटण ते विटा या रस्त्याचे पडले आहेत, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी रस्त्यावर झालेले डांबरीकरण व पॅचवर्क गुणवत्तापूर्ण नसल्याचा आरोप वाहनधारकांतून होत आहे. लहान-मोठे अपघात सातत्याने घडत आहेत. जखमींना उपचारासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर रात्रं-दिवस मोठी वर्दळ असते. रात्रीच्यावेळी खड्यांचा अंदाज न आल्याने अपघात घडत आहेत.
दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. यापूर्वीच या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली होती. मात्र नंतर तात्पुरती मलमपट्टी करत काही ठिकाणचे खड्डे मुजविण्यात आले. हा रस्ता राष्ट्रीय मार्गावर येत असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. मागील काही वर्षांमध्ये अवजड वाहतूक वाढली आहे. त्यामुळे सुरक्षितता धोक्यात आली आहे. अनेकवेळा वाहने रस्त्यावरच कं पडतात. यामुळे वाहतुकीस अडथळ होऊन अपघाताचा धोका वाढतो अनेकदा ट्रॉली जोडून निघालेले ट्रॅक्ट रस्त्यावरच बंद पडतात. त्यामुठं वाहतुकीची कोंडी होते. संपूर्ण रस्त नव्याने दर्जेदार बनवावा, अशी मागण वाहनधारकांतून होत आहे. अन्यथ याप्रश्नी आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांना दिला आहे.