Earthquake | चांदोली धरण परिसरात ३ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

चांदोली परिसरात आज (बुधवार) पहाटे 4 वाजुन 47 मिनिटांनी 3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला
Earthquakes in Chandoli dam area
चांदोली धरणाचे दोन दरवाजे उघडलेfile photo
Published on
Updated on

वारणावती : पुढारी वृत्तसेवा

चांदोली परिसरात आज (बुधवार) पहाटे 4 वाजुन 47 मिनिटांनी 3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. हा भूकंपाचा धक्का वारणावती परिसरात जाणवला असून, या धक्क्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू वारणावती पासुन ८ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाच्या धक्क्यामुळे वारणा धरणाला कोणताही धोका नाही असे धरण प्रशासनाने सांगितले आहे.

28 मे रोजी ही संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास 2.8 रिश्टर स्केलचा धक्का चांदोली परिसराला बसला होता. पुन्हा आठ दिवसानंतर तेवढ्याच क्षमतेचा धक्का बसला होता. आता साधारण दीड महिन्यानंतर पून्हा भूकंपाचा धक्का बसला आहे. या धक्क्यामुळे दीड महिन्यात तीन धक्क्यांची नोंद झाली आहे.

पहाटेची वेळ आणि निरव शांतता असल्यामुळे हा धक्का परिसरात जाणवला. या धक्क्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news