दिघंची : पुढारी वृत्तसेवा: सांगली जिल्ह्यातील विभुतवाडी (ता.आटपाडी) गावचे सुपुत्र आणि केंद्रीय राखीव पोलीस दलातील हवालदार काकासाहेब दादा पावणे (वय ४३) जम्मू-काश्मीर मध्ये शहीद झाले. रविवारी (दि. २५) सकाळी १० वाजता विभूतवाडी (ता. आटपाडी) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ, भावजय असा परिवार आहे. (Sangli News)
काकासाहेब यांचे शिक्षण विभूतवाडी येथे झाले. घरची परिस्थिती बेताची होती. आई वडिलांनी गरिबीतून कसे बसे त्यांना शिक्षण दिले. काकासाहेब २००७ मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झाले होते. पुढच्या वर्षी ते सेवानिवृत्त होणार होते. परंतु, कर्तव्य बजावत असताना एका इमारतीवर उभे असताना त्यांचा पाय घसरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे विभूतवाडीत शोककळा पसरली आहे. (Sangli News)