

शिराळा शहर : भाटशिरगाव (ता. शिराळा) ग्रामपंचायतीस टाळे ठोकणार्या सर्व 12 जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिवारी ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी शिराळा पंचायत समितीसमोर सुरू केलेले बेमुदत ठिय्या आंदोलन सहाव्या दिवशी मागे घेतले.
भाटशिरगाव येथे दि. 16 जूनरोजी अधिकारी व कर्मचार्यांना जबरदस्तीने बाहेर काढून ग्रामपंचायतीस टाळे ठोकणार्यांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी दि. 30 जूनपासून ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले होते. दि. 3 जुलैरोजी ग्रामपंचायत अधिकारी सचिन मोरे यांनी 5 जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला. मात्र उर्वरित 7 जणांवरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत ग्रामस्थांनी आंदोलन सुरूच ठेवले होते.
शनिवारी आमदार सत्यजित देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी नगरसेवक केदार नलवडे यांच्या मध्यस्थीनंतर उर्वरित सात 7 व्यक्तींविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पंचायत समितीसमोर सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.