आटपाडी : पुढारी वृत्तसेवा
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब सौदे बाजारात आज दर्जेदार डाळिंबाला प्रतिकिलो तब्बल ५५१ रुपये असा दर मिळाला. पंढरीनाथ नागणे यांच्या मंगलमूर्ती फ्रुट सप्लायर्स मध्ये नातेपुते येथील शिवलिंग माने यांच्या डाळिंबाला हा भाव मिळाला.
श्रावण महिन्याचा शुभारंभ होताच डाळिंबाचे दर वाढले आहेत. किमान ८० ते कमाल २०० रुपये प्रतिकिलो असा भाव आहे. सध्या बाजार समितीच्या सौदे बाजारात दररोज सरासरी ३ ते ४ हजार क्रेटची आवक होते. त्यापैकी निम्मी आवक मंगलमूर्ती फ्रुट सप्लायर्स मध्ये होते. माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील शिवलिंग माने यांच्या डाळिंबाला दर्जानुसार प्रतिकिलो ५४,८६,११३,१४०,५५१ पर्यंत प्रति किलो असा दर मिळाला.
पिलीव येथील जहांगीर शमसुद्दीन मुलाणी यांच्या मालाला ६८,९९, १४६,२००,२६४ माळशिरस येथील चांगदेव वाघमोडे यांच्या मालाला ५७,८६,१०४,१३६,१७१ श्रीगोंदा अहिल्यानगर येथील बंडू दत्तू लकडे यांच्या डाळिंबाला ४०,७४,९६, १२२, १४१ असा दर मिळाला. दर्जेदार लालचुटुक डाळिंबाला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला.
आटपाडी बाजार समिती सौदे बाजारात डाळिंबासोबत ड्रॅगन फ्रुट, पेरूचीही दैनंदिन आवक वाढलेली आहे. चांगल्या मालाबरोबरच डॅमेज मालाचे ही दर तेजीत आहेत.
शेतकऱ्यांनी बागेत येणाऱ्या व्यापाऱ्यांना कमी दरात माल देण्याऐवजी बाजार समितीच्या सौदे बाजारात आपला माल देऊन चांगला भाव मिळवावा
पंढरीनाथ नागणे
(चेअरमन मंगलमूर्ती उद्योग समूह)
बाजार समिती सौदे बाजारात राज्यातील आणि देशातील फळ विक्रेते आणि व्यापारी हजेरी लावतात. बाजारात पारदर्शक कारभारामुळे दर्जेदार आणि डॅमेज डाळिंबाला देखील चांगला दर मिळतो-
संतोष पुजारी (सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती)
बाजार समितीत सध्या ४००० क्रेट म्हणजे ८० टन डाळिंबाची आवक आणि विक्री होते. आवक वाढत चालली आहे.
सचिव शशिकांत जाधव
कृषी उत्पन्न बाजार समिती