सांगली : अवकाळी पावसाने कवलापुरात गाजराचे पीक झाले मातीमोल | पुढारी

सांगली : अवकाळी पावसाने कवलापुरात गाजराचे पीक झाले मातीमोल

बुधगाव : पुढारी वृत्तसेवा

काही दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे गाजराचे पीक मातीमोल झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने बेचव आणि पांढरी पडलेल्या गाजराला ग्राहकच नाही. ती काढून बाजारात घेऊन जाण्याचा खर्चही परवडत नसल्याने शेतातच माल पडून कुजत आहे.

कवलापूर येथे पारंपरिक गाजराची शेती करणारे शेतकरी आहेत. गाजर लागवडीसाठी येणारा खर्च वगळता एकरी 80 हजार ते एक लाखापर्यंत उत्पन्न मिळते. जमिनीत ओल अजून असल्याने गाजराची वाढ खुंटली असून फुटवा आला आहे. व्यापारी प्रती किलो फक्त 3 रुपये दर देत असल्याने शेतकर्‍यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. तर चांगल्या गाजरास प्रती किलो 3 ते 8 रुपये दर मिळतो आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button