kavthemahankal municipal : कवठेमहांकाळमध्ये आघाडी की ‘स्वबळ’ - पुढारी

kavthemahankal municipal : कवठेमहांकाळमध्ये आघाडी की ‘स्वबळ’

कवठेमहांकाळ : गोरख चव्हाण : kavthemahankal municipal : कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नव्या-जुन्या चेहर्‍यांमध्ये नगरसेवक होण्यासाठीची तयारी सुरू झाली आहे.

दरम्यान, काही पक्षांनी स्वबळावर लढण्याची भूमिका जाहीर केली आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीत रंगत येण्याची शक्यता आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग होणार की स्वबळाची ताकद अजमावणार, याची चर्चा होत आहे.

(kavthemahankal municipal) कवठेमहांकाळ नगरपंचायतीची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रक्रिया सुरू झाल्यामुळे शहरात राजकारण तापू लागले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे नगरपंचायत निवडणुकीतही महाविकास आघाडीचा प्रयोग होणार असल्याची चर्चा आहे.

याचवेळी दुसरीकडे भाजप, आरपीआय, वंचित बहुजन आघाडी, बसपा यांनी स्वबळावर लढण्याची भूमिका जाहीर केली आहे.

नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार सुमनताई पाटील महांकालीच्या अध्यक्षा अनिता सगरे यांनी स्वाभिमानी विकास आघाडी करत सत्ता मिळवली होती. खासदार संजय पाटील गटाला चार जागांवर समाधान मानावे लागले होते. चार – पाच वर्षांच्या कलावधीत शहरातील राजकारणात नेहमीच नवीन राजकीय प्रयोग झाले होते.

आता प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे जुन्या-नव्या चेहर्‍यांनी आपल्या सोयीचा प्रभाग कोणता याबाबत विचार सुरू केला आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीत नेत्यांपुढे कोणाला उमेदवारी द्यायची, याबाबत प्रश्न उभा राहणार आहे.

सध्या निवडणुकीसाठी शहरात नव्या चेहर्‍यांची मोठी संख्या आहे. यातील कोणा – कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरातील राजकारणात अंतर्गत खलबते सुरू असल्याचे चित्र आहे.

अमेरिकन रिटर्न प्रियकरला पाच वर्षाची सक्तमजुरी; प्रेयसीचे अश्लील व्हिडिओ केले होते व्हायरल

Back to top button