सांगली :भरदिवसा फ्लॅट फोडून 23 तोळे दागिने लंपास | पुढारी

सांगली :भरदिवसा फ्लॅट फोडून 23 तोळे दागिने लंपास

सांगली : पुढारी वृत्तसेवा : विश्रामबाग येथील एलआयसी कॉलनीतील सेवा निवृत्त सहायक फौजदाराचा फ्लॅट चोरट्यांनी भरदिवसा फोडला. त्यामध्ये 23 तोळे सोन्या-चांदीचे दागिने चोरीस गेले. सोमवारी भरदुपारी हा प्रकार घडला.

याबाबत फिर्याद विठ्ठल राजाराम कोळी यांनी विश्रामबाग पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी अज्ञातविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विश्रामबाग येथील शंभरफुटीलगत एलआयसी कॉलनी आहे.

त्या ठिकाणी सेवानिवृत्त सहायक फौजदार कोळी यांचा फ्लॅट आहे. कोळी हे आष्टा पोलिस ठाण्यातून सहा महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. सोमवारी ते कुटुंबासह परगावी गेल्याने त्यांच्या फ्लॅटला कुुलूप होते.

Back to top button