बेकायदेशीर वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर जप्त; गुन्हा दाखल | पुढारी

बेकायदेशीर वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर जप्त; गुन्हा दाखल

जत : पुढारी वृत्तसेवा

जत तालुक्यातील मोरबगी येथे विजयपूर रस्त्यावर बेकायदेशीर वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरचा पाठलाग करून पोलिसांनी ट्रॅक्टरसह ट्रॉली व १ ब्रास वाळू जप्त केली आहे . विनापरवाना शासनाचा महसूल चुकूवून वाळू उपसा केल्याप्रकरणी कर्नाटक राज्यातील हन्नू लष्करी राठोड (रा. तांडा नंबर २, अरकेरी, ता. विजयपूर) असे गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जत पूर्व भागात नदीपात्रातून वाळू उपसा सुरू असल्याने, उमदी पोलीस पेट्रोलिंग करत होते. दरम्यान शनिवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांना वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर निदर्शनास आला. त्यानंतर पोलिसानी मोरबगी येथील शाळेसमोर सदरचा ट्रॅक्टर ताब्यात घेतला. ट्रॅक्टर व वाळू असा साडेतीन लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पोलीस कॉन्स्टेबल इंद्रजित गोदे यांनी केली आहे.

हे ही वाचा :

Back to top button