अमली पदार्थांची वा़ढती तस्करी चव्हाट्यावर | पुढारी

अमली पदार्थांची वा़ढती तस्करी चव्हाट्यावर

सांगली ;मुंबईतील ड्रग्जवरील  करसवाईचे प्रकरण दोन महिन्यांपासून गाजत आहे. त्याचवेळी टांझानियातील माकेटो जॉन झाकिया (वय 25, रा. जमोरिया मंगानो) याच्याकडून सुमारे 10 लाख 90 हजार रुपये किमतीचे 109 ग्रॅम कोकेन जप्त केले.
हा झाकिया हे कोकेन विक्रीसाठी बंगळुरूला निघाला होता.

सांगली पोलिसांनी त्याची ही तस्करी उघड करीत त्याला जेरबंद केले आहे. त्याने आतापर्यंत कोणत्या ठिकाणी कोकेन पुुरवले, त्याचा वापर कशासाठी करण्यात येत होता. याची माहिती पोलिस घेत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात गांजाची स्करीतही मोठ्या प्रमाणात होत असते. गांजाची झाडे काही जण शेतात लावतात.

विशेषत: जिल्ह्याच्या पूर्व भागात आणि कर्नाटक सीमेवर गांजाची लागवड करून त्याची विक्री कर्नाटकात होते. गेल्या काही वषार्ंत जिल्ह्यातही गांजाचा वापर आणि विक्री करीत असलेले तरुण सापडत आहेत. कोरोना संसर्गामुळे बहुतांश व्यवहार ठप्प होते. तरी सुद्धा पोलिसांनी दहा महिन्यांत 59 जणांना अटक करून 19 लाखांचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत.

जगभरात कोलंबिया, बोलिव्हिया आणि पेरू या देशांमध्ये कोकेनचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. या तीन देशांमध्ये 13 लाख 5000 एकरांमध्ये कोका पानांची लागवड केली जाते. संयुक्त राष्ट्रांच्या अमली पदार्थविरोधी एजन्सीच्या मते कोलंबिया दरवर्षी 300 ते 400 टन कोकेन तयार करते.

जागतिक औषध अहवालानुसार, 2018 मध्ये जगभरातील 269 दशलक्ष लोकांनी ड्रग्स वापरली, जे 2009 च्या तुलनेत 30 टक्के जास्त आहे. तर 35.6 दशलक्षाहून अधिक जण असंख्य विकारांनी ग्रस्त आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, गेल्या दशकात अमली पदार्थ आणि संबंधित विकारांमुळे मृत्यूच्या संख्येत 71 टक्के वाढ झाली आहे.

 गांजाने जनावरे होतात‘अ‍ॅक्टिव्ह’

जनावरांचा व्यापार करणारे अनेक व्यापारी जनावरे खरेदी केल्यानंतर त्यांना चार्‍यातून गांजा खायला घालतात. त्यामुळे जनावरांत ‘अ‍ॅक्टिव्ह’ पणा येतो. यातूनच चारा जादा खाऊन जनावरांना जादा किंमत मिळते, तसेच जनावरेदेखील तरतरीत दिसतात असा अनेकांचा गैरसमज आहे. कर्नाटक सीमाभागात तयार होणारा गांजा त्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. याला अनेक पशुपालकांकडून दुजोरा देण्यात आला.

 अमली पदार्थांच्या नशेमुळे गुन्हेगारीत वाढ

क्राइम ब्युरोच्या नोंदीनुसार खून, दरोडा, अपहरण इतर सर्व प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये नशेचे प्रमाण 73.5 टक्के आणि बलात्कारासारख्या गुन्ह्यात हे 87 टक्के आहे. गुन्हेगारी, गंभीर आजार आणि हिंसाचारामध्येही नशेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. नशेमुळे या लहान निर्दोषाचे बालपण उद्ध्वस्त होत आहे. मुलांचा मानसिक विकास नशेमुळे थांबतो. नशेकरिता मोबाईल, पर्स, चेन स्नॅचिंग, वाहने चोरी यासारखे गुन्हे केले जातात.

 

Back to top button