सांगली : ‘ठाणेदारां’चे ‘खातेबदल’ ऐरणीवर | पुढारी

सांगली : ‘ठाणेदारां’चे ‘खातेबदल’ ऐरणीवर

“सांगली : पुढारी वृत्तसेवा” image=”http://”][/author]

महापालिकेतील अनेक विभागात ठाण मांडून हितसंबंध निर्माण केलेले कर्मचारी महापालिका प्रशासनाच्या रडारवर आलेले नाहीत. सन 2005-06 नंतर कर्मचारी बदल्या झालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या ‘खातेबदला’ चा विषय आता ऐरणीवर आला आहे.
महापालिकेच्या दहा वैद्यकीय अधिकार्‍यांची बदली झाली आहे

. एकाच ठिकाणी दहा वर्षे सेवा केल्याचा निकष लावून बदली आदेश काढले आहेत. त्यावरून काहींनी नाराजी व्यक्त केली. कोरोना कालावधीत दिवस-रात्र चांगले काम करूनही बदली झाल्याबद्दल काहींनी नाराजी व्यक्त केली.

महापालिकेकडील कर्मचार्‍यांच्या वर्षानुवर्षे बदल्या झाल्या नसताना केवळ वैद्यकीय अधिकार्‍यांच्याच बदल्या कशा झाल्या, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावरून कर्मचारी बदल्यांचा विषय चर्चेत आला आहे.
पूर्वी जकात, घरपट्टी, पाणीपट्टी, आस्थापना, नगररचना हे विभाग
चर्चेत असायचे.

दर तीन-चार वर्षांनी या विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्या व्हायच्या. दरम्यान, या विभागांपैकी आता जकात
विभाग बंद झाला आहे. घरपट्टी, पाणीपट्टी, आस्थापना, बांधकाम, नगररचना व अन्य विभागातील किरकोळ बदल्यांचा अपवाद वगळता सन 2005-06 नंतर बदल्या झाल्या नाहीत

. त्याची चर्चा महापालिका वर्तुळात
आहे. काही विभागात अनेक वर्षे काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा ‘खातेबदल’ व्हावा, अशी मागणी होत
आहे. अनेक विभागात कर्मचारी अनेक वर्षे ठाण मांडून आहेत. अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच टेबलवर काम करत आहेत

कामावर दांडी मारून मानधन उचलणारेही अनेक

महापालिकेत एक हजारावर मानधनी कर्मचारी आहेत. काही मानधनी कर्मचार्‍यांबाबत तक्रारी होत आहेत. महापालिकेत कामावर हजर न राहता ते दरमहा मानधन मात्र घेतात आणि अन्यत्र खासगी काम करतात. काहींनी व्यवसाय सुरू केले आहेत, अशा तक्रारी काही नगरसेवकांकडून पुढे येत आहेत. त्यामुळे महापालिकेत कामावर दांडी मारूनही मानधन उचलणार्‍यांवर प्रशासनाने नजर ठेवणे आवश्यक आहे.

 

Back to top button