सांगली जिल्ह्यातील वाटेगावमध्ये एस.टी. वर दगडफेक | पुढारी

सांगली जिल्ह्यातील वाटेगावमध्ये एस.टी. वर दगडफेक

सांगली/इस्लामपूर : पुढारी वृत्तेसवा

विलिनीकरणाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या संपाला पाचव्या दिवशी हिंसक वळण मिळाले. वाटेगाव (ता. वाळवा) येथे इस्लामपूर आगाराच्या एस.टी. वर अज्ञातांनी दगडफेक केली. याप्रकरणी चालक अनिल बापू देसाई यांनी कासेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.

एस.टी. कर्मचार्‍यांच्या संपाचा शुक्रवारी पाचवा दिवस होता. दिवसेंदिवस संपाची तीव्रता वाढत असून प्रवाशांची मात्र गैरसोय होत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक आगारातून खासगी वाहतूक करण्यात येत आहे.

संपाची कोंडी फोडण्यासाठी इस्लामपूर आगारातून इस्लामपूर-वाटेगाव एस.टी. सोडण्यात आली. गाडी प्रवाशांना घेवून इस्लामपुरातून रवाना झाली. वाटेगाव येथे प्रवाशांना उतरुन पुन्हा इस्लामपूरकडे येण्यासाठी वाटेगाव स्थानकासमोर थांबली होती. यावेळी अज्ञातांनी गाडीवर दगडफेक करीत गाडीच्या काचा फोड्या. यामध्ये 10 ते 15 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी कासेगाव पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगली आगारातून खासगी मालकीच्या दोन शिवशाही स्वारगेटसाठी सोडण्यात आल्या. दोन्ही शिवशाहीमधून सुमारे 55 प्रवासी पुण्याकडे रवाना झाले. तर स्वारगेट येथून देखील सांगलीसाठी दोन शिवशाही सोडण्यात आल्या आहे. रात्री उशिरा त्या सांगली आगारात दाखल झाल्या.

Back to top button