सांगली जिल्ह्यात कडक निर्बंध लागणार; जयंत पाटील | पुढारी

सांगली जिल्ह्यात कडक निर्बंध लागणार; जयंत पाटील

सांगली; पुढारी वृत्तसेवा: सांगली जिल्ह्यात कडक निर्बंध पु्न्हा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी दर अद्याप 10 ते 20 च्या दरम्यान आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्हीटी दर कमी करण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध आणखी कडक करण्यात यावेत.

सांगली जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्याबाबत जिल्हाधिकारी लवकरच नवीन आदेश काढतील, असे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

सांगली

 

 

 

 

अधिक वाचा : 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले,  जिल्ह्यात सध्या दररोज 13 ते 14 हजार कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. चाचणीच्या प्रमाणात जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर 10 टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर 91 टक्के इतका आहे. त्यामुळे नियमानुसार जिल्हा चौथ्या टप्प्यात आहे.

अधिक वाचा : 

जिल्ह्याचा पॉझिटिव्ही दर कमी करण्यासाठी आता आणखीन कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. त्याची सर्व स्तरांवर काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. कोरोना साखळी तोडण्यासाठी व्यापार्‍यांनी देखील सहकार्य करावे.

अधिक वाचा :

निर्बंध आणखी कडक केल्याशिवाय कोरोना रुग्ण संख्या कमी होणार नाही. त्यामुळे किराणा साहित्य आणि भाजीपाला घरपोच देण्याची सोय करण्यात यावी. याबाबत जिल्हाधिकारी नियमावली जाहीर करून नवीन आदेश काढतील. असे त्यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचलत का ?

Back to top button