जत : बेवनूरमध्ये भावावर चाकू हल्ला | पुढारी

जत : बेवनूरमध्ये भावावर चाकू हल्ला

जत; पुढारी वृत्तसेवा : बेवनूर (ता. जत) येथे पैसे का देत नाही, असे म्हणत सख्खा भावानेच भावावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. रमेश सुनील सरगर (वय 30) असे गुन्हा दाखल झालेल्या सख्या भावाचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली.

याबाबतची फिर्याद उमेश सुनील सरगर (वय 27) यांनी जत पोलिसात दिली आहे. शनिवारी सकाळी रमेशने उमेशला गावात पानपट्टीत जाऊन पन्नास रुपये मागितले. मात्र पैसे दिले नाहीत त्यामुळे हल्ला करण्यात आला.

Back to top button