सांगलीत घर फोडले; दागिने, रोकड लंपास | पुढारी

सांगलीत घर फोडले; दागिने, रोकड लंपास

सांगली : पुढारी वृत्तसेवा :  येथील शंभफुटी रस्त्यालगत विनायकनगरमध्ये राजेंद्र निवृत्ती चव्हाण (वय ५०) यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व दहा हजाराची रोकड असा एकूण साठ हजाराचा ऐवज लंपास केला.

दि. १८ जानेवारीरोजी चव्हाण कुटुंब परगावी गेले होते. याचदिवशी मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला बेडरूममधील कपाटातील साहित्य विस्कटले. मात्र आत काहीच नव्हते. स्वयंपाक खोलीत एक लोखंडी कपाट होते. त्यामधील साहित्यही विस्कटले. लॉकरमधील साठ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व दहा हजाराची रोकड घेऊन चोरट्यांनी पलायन केले.

दि. १९ जानेवारीला चव्हाण कुटुंब सायंकाळी परगावाहून आले. त्यावेळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. रात्री उशिरा चव्हाण यांची फिर्याद गुन्हा दाखल केला. चोरटे शंभरफुटी रस्ता परिसरातील असावेत, असा संशय आहे. तेथील स्थानिक लोकांकडे चौकशी केली जात आहे. शंभरफुटी रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही तपासले. पण संशयास्पद काहीच आढळून आले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

Back to top button